नांदेड – खानापूर परिसराला कोरोनाचा विळखा…

किरकटवाडी (पुणे) : लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर सिंहगड रोड परिसरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. नांदेड, किरकटवाडी, खडकवासला या गावांमध्ये आणखी 14 तर खानापूर मध्ये काल पुन्हा 7 नवीन रुग्णांची वाढ झाल्याने नांदेड ते खानापूर या परिसरातील आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या 64 वर जाऊन पोहोचली आहे. या पैकी 19 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 44 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर नांदेड येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांच्याकडून देण्यात आली. खानापूर येथील रुग्णसंख्या तीनच दिवसात 25 झाली आहे.

नांदेड सिटी येथे राहणाऱ्या व पुणे शहरात बँकेत नोकरी करणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर घरीच होम आयसोलेशनमध्ये खासगी रुग्णालयामार्फत उपचार सुरु आहेत.

नांदेड सिटी मधीलच आणखी एका 63 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी डोळ्यांच्या दवाखान्यात गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी ताप व खोकला जाणवू लागल्याने खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक काशिनाथ खुडे यांच्याकडून देण्यात आली.

नांदेड सिटी मधीलच एकाच घरातील चौघांसह अन्य एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांदेड मधील घाडगे ईस्टेट मधील एका व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नांदेड सिटीसह नांदेड मधील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठ झाली आहे. किरकटवाडीतील अगोदर पॉझिटिव्ह आलेल्या ‘त्या’ महिलेच्या कुटुंबातील तिचा 15 वर्षांचा मुलगा व 75 वर्षांचा सासरा यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवणे येथे स्लाइडिंग खिडक्या बनवण्याचे दुकान असणाऱ्या किरकटवाडीतील 40 वर्षीय व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तर किरकटवाडी फाट्याजवळील एका रिक्षाचालकाच्या मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

खडकवासला येथील पॉझिटिव्ह आलेल्या 21 वर्षीय तरुणाच्या आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर महानगरपालिकेत चालक म्हणून नोकरी करणाऱ्या कोल्हेवाडी येथील 53 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. वंदना गवळी यांच्याकडून देण्यात आली. खानापूर येथील 18 पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील काही व्यक्तींचे अहवाल येणे बाकी होते त्यातील आणखी सात पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या 25 झाली आहे. नांदेड ते खानापूरपर्यंत झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी आहे. नागरिक व व्यावसायिक यांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींवर प्रशासनाकडूनही कडक कारवाई झाल्याशिवाय रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालणे शक्य होणार नाही.

दरम्यान हवेली पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या तब्बल अकरा प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बंदोबस्त तैनात करताना व पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज पार पाडताना पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांची मोठी धावपळ होताना दिसत आहे. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सिंहगड व खडकवासला धरण पर्यटकांसाठी बंद असल्याने त्याठिकाणीही पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागत आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
Get started
%d bloggers like this: