‘वंदेभारत’ अभियानांतर्गत १८२ विमानांनी २८ हजार ४३५ प्रवासी मुंबईत दाखल

१५ जुलैपर्यंत आणखी ४० विमानांनी येणार प्रवासी

मुंबई दि. २: परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम  महाराष्ट्र शासनाकडून सातत्यपूर्ण रितीने सुरुच असून आतापर्यंत १८२ विमानांनी २८ हजार ४३५ नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ३४७ आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ९ हजार ७५२ आहे तर इतर राज्यातील ८ हजार ३३६ प्रवासीही आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत. १५ जुलै २०२० पर्यंत राज्यात आणखी ४० विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना या अभियानांतर्गत मुंबईत उतरून घेऊन त्यांना क्वारंटाईन करून घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.

या देशातून आले प्रवासी…

प्रवासी विविध देशातून आले असून ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका,  इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आयर्लंड, कतार, हाँगकाँग,  कझाकिस्तान, मॉरिशिअस, ब्राझील, थायलंड,  केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन,  इथिओपिया,रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर,  नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व आफ्रिका,  फ्रान्स, नैरोबी,न्यूयार्क, जॉर्जिया, कामेरुन,  या देशांचा समावेश आहे.

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम  जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. ‘वंदेभारत’ अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक  परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि.  यांच्या समन्वयाने केले जात आहे.

वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
Get started
%d bloggers like this: