मुंबई उपनगर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी संकेतस्थळावर आधार क्रमांक व इतर माहिती नोंदविण्याचे आवाहन

मुंबई दि. 14: राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छुक उमेदवारांना नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि मुंबई उपनगर जिल्ह्यातील आतापर्यंत नोंदणी केलेल्या बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या आधार क्रमांकाची नोंद केलेली नाही. तरी अशा उमेदवारांना आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांकही जोडावा लागणार आहे, अन्यथा 15 ऑगस्टनंतर त्यांची... Continue Reading →

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जालना येथे कोविड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. जालना दि. 12 (जिमाका) : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे. आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल. मार्च महिन्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या राज्यात केवळ दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या 110 वर पोहोचली आहे.... Continue Reading →

सावधानतेने वापरा हॉटेल व लॉज सुविधा!

कोरोनासोबत जगताना अनेक अत्यावश्यक बाबी पुढच्या काळात कराव्या लागणार आहेत. कामांसाठी, व्यवसायासाठी व शिक्षण प्रशिक्षणासाठी किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास व अनुषंगिक हॉटेल व लॉज सुविधा वापरणे अनिवार्य ठरते. अशावेळी आता पूर्वीसारखे बिनधास्त जगणे मात्र असणार नाही. हॉटेल व्यावसायिकांना काही अटी व शर्तीवर मर्यादित स्वरूपात हॉटेल सुरू करायला परवानगी मिळाली आहे. सोबतच हॉटेल मालकासह ग्राहकांनी देखील... Continue Reading →

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्याचा विचार करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

राज्य समितीच्या शिफारशी आणि कुलगुरूंच्या सूचना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय मुंबई, दि. ९ : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. श्री.सामंत... Continue Reading →

सोशल मीडियावरील चुकीच्या ‘मेसेजेस’ पासून सावध रहा

महाराष्ट्र सायबर विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन मुंबई, दि. ९ : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. त्यात प्रामुख्याने व्हाट्सॲपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज, चुकीच्या पोस्ट्स पाठवून तसेच महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता... Continue Reading →

लॉकडाऊन काळात ५२६ सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक

मुंबई दि.८- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२६ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ७ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे- ■ व्हॉट्सॲप- १९९ गुन्हे ■ फेसबुक पोस्ट्स –... Continue Reading →

दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास आता २ तास वाढीव परवानगी

मुंबई, दि. ७ – दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तथा कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील दुकाने तथा मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्यात येत आहेत. राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. ९ जुलैपासून ही संमती देण्यात येत आहे. तथापी, यासाठी आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले... Continue Reading →

कोरोना उपचार सुविधांसाठी महाराष्ट्राने ठेवला देशासमोर आदर्श!

मुंबई परिसरात सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधेचे कायमस्वरुपी रुग्णालय तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश ३ हजार ५२० बेड्सच्या जम्बो सुविधेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई, दि.७ : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे. ऑक्सिजन तसेच आयसीयु देखील उभारले आहेत. ही सुविधा तात्पुरती असली तरी... Continue Reading →

मुंबई, ठाण्यात गैरप्रकाराबाबत २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई

मुंबई, दि. ७: मुंबई, ठाणे परिसरात शिधावाटपात गैरप्रकार करणाऱ्या 29 स्वस्तधान्य दुकानदारांवर दक्षता पथकाकडून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली. मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना... Continue Reading →

‘टिकटॉक प्रो’ लिंकपासून सावध रहा !

महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन मुंबई, दि.७- टीकटॉकवर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही या ॲपचे अनेक वापरकर्ते व चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार व समाजकंटकांकडून एक फेक टीकटॉक प्रो लिंक बनविली आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. सध्याच्या काळात भारत सरकारने टीकटॉक... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website at WordPress.com
Get started