आता कोरोना चाचणी २० मिनिटात होणार; ‘या’ चाचणीने कमी होईल संक्रमणाचा वेग, तज्ज्ञांचा दावा

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण थांबवण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त लोकांची तपासणी केल्यास कोरोनाचे वाढते संक्रमण कमी होण्यास मदत होईल. कोरोनाच्या तपासणीसाठी आरटी,पीसीआर टेस्टचा वापर केला जात आहे. या टेस्टसाठी खूप वेळ लागत होता. पण कमी वेळात रिपोर्ट देतील अशा अनेक चाचण्या समोर आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी २० मिनिटात... Continue Reading →

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जालना येथे कोविड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. जालना दि. 12 (जिमाका) : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे. आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल. मार्च महिन्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या राज्यात केवळ दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या 110 वर पोहोचली आहे.... Continue Reading →

लॉकडाऊन काळात ५२६ सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक

मुंबई दि.८- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२६ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ७ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे- ■ व्हॉट्सॲप- १९९ गुन्हे ■ फेसबुक पोस्ट्स –... Continue Reading →

दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास आता २ तास वाढीव परवानगी

मुंबई, दि. ७ – दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तथा कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील दुकाने तथा मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्यात येत आहेत. राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. ९ जुलैपासून ही संमती देण्यात येत आहे. तथापी, यासाठी आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले... Continue Reading →

मुंबई, ठाण्यात गैरप्रकाराबाबत २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई

मुंबई, दि. ७: मुंबई, ठाणे परिसरात शिधावाटपात गैरप्रकार करणाऱ्या 29 स्वस्तधान्य दुकानदारांवर दक्षता पथकाकडून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली. मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website at WordPress.com
Get started